*डॉ. अमेय देसाई यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा करिता भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक पदी निवड*
देशात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनांना बळकटीकरण देण्याला वेग आलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टूडे सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा भारतात मोदीपर्व येण्याचे संकेत दिले असून देशातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षशिस्त याकरिता ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आपल्या संघटनात्मक रचनांवर नेहमीच काम करत असतो. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या संघटनात्मक रचना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या ज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेकरिता संयोजक म्हणून डॉ अमेय देसाई यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रासरुट ला काम करणारे डॉ देसाई विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत सुद्धा तितक्याच सलोख्याचे संबंध प्रस्थापित करुन आहेत. तळकोकणातील सर्वसामान्यांसोबत त्यांची जुळलेली नाळ , संघपरिवाराची त्यांची पार्श्वभूमी आणि राज्यातील नेतृत्वासोबत असलेला त्यांचा थेट संपर्क या सगळ्या गोष्टी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजप ला विजयश्री खेचून आणण्यासाठी किती निर्णायक ठरतील हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.