You are currently viewing मालवण तालुक्यातील थट्टा मासळी मार्केटच्या मागे भर दुपारी बसते जुगार बैठक

मालवण तालुक्यातील थट्टा मासळी मार्केटच्या मागे भर दुपारी बसते जुगार बैठक

*कणकवलीतील “हु”षार युवक खेळतो लाखाचे डाव*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमविण्याचे जर कुठले उद्योग असतील तर ते म्हणजे दारू, जुगार आणि मटका असे राजरोज सुरू असणारे अवैद्य धंदे..! त्यामुळे झटपट पैसा कमविण्याचे स्वप्न उराशी बाळगून श्रीमंत होण्यासाठी धडपडणारी युवा पिढी बरबादीच्या मार्गाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

मालवण तालुक्यातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या थट्टा येतील मासळी मार्केटच्या मागे भर दिवसा दुपारी ३.०० वाजता जुगाराची मैफिल रंगते आणि या मैफिलीत कणकवली येथील एक “हु”षार युवक तब्बल एक एक लाखाचे डाव खेळतो. रविवारी रंगलेल्या मैफिलीत या “हु”षार युवकाने तब्बल अडीच लाख रुपये खेळले आणि एका दिवसात जुगारात अडीच लाख रुपये हारला. परंतु लाखांचे डाव खेळणारे हे युवक जरी जुगारात हरले तरी जुगाराची मैफिल रंगविणाऱ्या तक्षिमदारांकडून त्यांना जागच्या जागी व्याजाने पैसे दिले जातात ते सुद्धा लाखांमध्ये..! आजच्या खेळात या “हु”षार नामक युवकाने तब्बल दोन लाख रुपये व्याजाने घेतले. कोणतेही तारण नसताना जिथे सरकारी बँका सुद्धा दहा हजार द्यायला मागेपुढे पाहतात तिथे जुगारासारख्या अवैद्य धंद्यांना जागच्या जागी लाखो रुपये व्याजाने दिले जातात म्हणजे नक्कीच देश प्रगती करत असल्याचे चिन्ह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाकी वर्दीच्या आशीर्वादाने जनतेला पहावयास मिळत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य धंद्याच्या नादाने बरबाद होणारी पिढी जिल्ह्याचे पोलीस वर्दीचे रक्षक वाचविणार आहेत की खाकी वर्दीच्या आशीर्वादानेच जुगाऱ्यांना सहकार्य मिळणार आहे..?? हा प्रश्न प्रत्येक जिल्हावासीयाच्या मनात आ-वासून उभा आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जुगारासारख्या अवैध्य धंद्यांकडे गांभीर्याने पाहणार आहेत की नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा