देवगड :
देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्सव देवगड येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी सायंकाळी ४:३० वाजता देवगड येथील हॉटेल निखिल लंच होम नजिक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यानिमित्त आयोजित कार्यक्रम सकाळी ८:३० ते ९:३० छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी ९:३० ते ९:४५ मराठा समाज कार्यालयाचे उद्घाटन,सकाळी ९:४५ ते १० ध्वजारोहण, १० ते ११:३० देवगड मराठा समाज कार्यालय ते देवगड किल्ला अशी भव्य मिरवणूक, सकाळी ८ ते सायंकाळी ६ ढोल पथक, सायंकाळी ४:३० ते ५:३० वेशभूषा स्पर्धा ऐतिहासिक, सायंकाळी ५:३० ते ६:३० पोवाडा. भारताच्या राष्ट्रपतींसमोर सलग पाच वेळेस शाहिरी पोवाडा सादर करण्याचा सन्मान लाभलेले कोल्हापूर संस्थानचे दरबार शाहीर, शाहीर विशारद डॉ आजाद नायकवडी कोल्हापूर निर्मित डफाच्या बोलावर (शाहिरी पोवाडे स्मर्तीगीते व लोक गीतांचा बहारदार कार्यक्रम) होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ रील मेकिंग स्पर्धा (विषय ३५० वर्षे शिव अभिमानाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित) ७ ते ७:३० मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व मान्यवरांचा सत्कार, सायंकाळी ७:३० ते रात्री १० डबलबारी बुवा श्री संदीप नाईकधुरे (बापर्डे देवगड), बुवा श्री संतोष आरावकर (तुळसवडे राजापूर) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यांच्या पालकांनी बंटी कदम ९४२२५८४५१९, योगेश राणे ९४२३३०४०५० यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शिवजयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीमध्ये सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष संदीप साटम, किसन सूर्यवंशी, सरचिटणीस केदार सावंत, राजू सावंत ,मनोहर भगत ,योगेश राणे आदी उपस्थित होते.