You are currently viewing “अंतरीच्या खोल डोही” काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

“अंतरीच्या खोल डोही” काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

नवी पेठ, पुणे- (प्रतिनिधी – बाबू डिसोजा कुमठेकर)

दिनांक १० फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन, नवी पेठ येथे अखिल भारतीय प्रकाशक संघाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष श्री. राजीव बर्वे हे अध्यक्षस्थानी होते. श्री. संजय भास्कर जोशी, श्री. मंदार जोगळेकर, श्री. दत्तात्रय पाष्टे, संज्योती पब्लिकेशन्सचे प्रकाशक संजयभाऊ चौधरी हे मंचावर उपस्थित होते.

या कार्यशाळेत “पुस्तक विक्री”मध्ये अनेक नवनवीन प्रयोग यशस्वीपणे केलेल्या श्री. संजय भास्कर जोशी (पुस्तक पेठ), श्री. मंदार जोगळेकर (बुकगंगा), श्री. दत्तात्रय पाष्टे (डायमंड प्रकाशन), श्री. रोहन चंपानेरकर (रोहन प्रकाशन) व भार्गवी कानडे (Brandonomics) यांनी आपले विचार उपस्थित प्रकाशक सदस्यांपुढे मांडले. मार्गदर्शन, विचार, त्यांनी केलेले प्रयोग यावर हे चर्चासत्र होते.

“शासकीय ग्रंथ खरेदी “हा अतिशय महत्वाचा परंतु अनेक प्रकाशकांना तपशिलात फारसा ज्ञात नसणारा पुस्तकविक्रीचा मार्ग येथे श्री. राजीव बर्वे यांच्याकडून याबाबत प्रकाशकांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

श्री साई प्रतिष्ठान,पुणे आणि प्रतिष्ठीत संज्योती पब्लिकेशन्सच्या वतीने (प्रकाशक श्री. संजय भाऊ चौधरी) पिंपरी चिंचवड च्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रज्ञा घोडके यांच्या दर्जेदार सहाव्या कविता संग्रहाचे “अंतरीच्या खोल डोही” चे प्रकाशन करण्यात आले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे कवयित्री प्रज्ञा घोडके उपस्थित राहू शकल्या नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा