सावंतवाडी :
महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी “शिवबा” हे महानाट्य सादर करण्यात आले. यावेळी छत्रपतींचा जाज्वल इतिहास पाहण्यासाठी प्रेक्षक व शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कोकण कला अकादमीच्या माध्यमातून महासंस्कृती या महोत्सवाच्या निमित्ताने रंगमंचावर “शिवबा” हा महानाट्य प्रयोग सादर करण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी छत्रपतींचे बालपण, तलवार चालवणे, दाडपट्टा चालवणे, आदी युद्धनीती, त्याच बरोबर अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती असे विविध प्रसंग प्रेक्षकांसमोर सादर केले. हा जाज्वल इतिहास पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांना प्रतिसाद दिला. दरम्यान काल चौथ्या दिवशी अशोक हांडे प्रस्तुत “मराठी बाणा” या कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत, परंपरा, सण यांचा मिलाप आणि महती सांगणाऱ्या विविध रंगी कार्यक्रम सादर करण्यात आला.