You are currently viewing महाराष्ट्रात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात : दीपक केसरकर

महाराष्ट्रात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात : दीपक केसरकर

कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ

सावंतवाडी
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे, हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले. अशा पक्षप्रमुख ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा असे आवाहन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष तथा सावंतवाडी तालुका निरीक्षक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी शुभारंभ पार पडला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, उपतालुका प्रमुख बाळू माळकर, महिला उपतालुका संघटक चित्रा धुरी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, विभाग प्रमुख नामदेव नाईक, उपविभाग प्रमुख भरत सावंत, बाळु गवस, कोलगाव सरपंच शिवदत्त घोगळे, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, कोलगाव शाखाप्रमुख सुधाकर चव्हाण, आंबेगाव दीपक नाईक, भाई सावंत, बाळु कारिवडेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
निरीक्षक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला साथ देतो आणि शेतकऱ्यांचा कष्टाचे पैसे हे कोणाच्या दडपणाखाली चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊन बॅंकेचे नुकसान होऊ नये यासाठीच शिवसेनेत आलो आणि याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कुठलही दडपण नाही. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याचा आनंद मिळतो. आज सभासद नोंदणीच्या निमित्ताने आपल्याला लोकांच्या गाठीभेटी घेण्याची संधी आली आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सभासद नोंदणी करून शिवसैनिक बनवा ती आपली पक्षाची ताकद असेल आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण विजय संपादन करून दडपशाही करून अन्याय करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करु शकतो, असे सावंत यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांनी संघटनात्मक पद्धतीने काम करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होऊ शकतात याचे मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =