मालवण / मसुरे :
क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ मुंबई यांचा वार्षिक स्नेहमेळावा दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योजक डॉ श्रीकृष्ण उर्फ दीपक परब याना ‘मराठा गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात परब यांनी “क्षत्रिय मराठा तावडे समाजाला मोठी परंपरा आहे. या समाजातील विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे अधिकारी होण्यास प्रेरणा मिळावी म्हणून मंडळाच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे. या मंडळाचा पुरस्कार मला जाहीर झाला हा मी माझा मोठा सन्मान समजतो. तसेच या मंडळाने पुरस्कारासोबत दिलेल्या ५१ हजार रुपयांचा स्वीकार करून त्यात मी माझ्याकडून आणखी ५० हजार रुपये मिळवून एक लाख एक हजार रुपये मंडळासाठी देत आहे.” मंडळाने विविध उपक्रमातून अशाच प्रकारे उन्नती साधावी, असे प्रतिपादन उद्योजक डॉ. दीपक परब यांनी येथे केले.
यावेळी अध्यक्ष दिनकर तावडे, खजिनदार प्रदीप तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, अशोक तावडे, सुहास तावडे, राजेंद्र तावडे, विजय तावडे, संतोष तावडे, प्रदीप तावडे, विलास तावडे, अनिकेत तावडे, चिनमय तावडे, नितीन तावडे, शिवराम तावडे, सौ एकता तावडे, सीमा संतोष तावडे, दिलीप तावडे, उद्योजिका सौ राधिका परब, कृषी भूषण मिलिंद प्रभू आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ आर्किटेक्ट विजय तावडे यांना कुलभूषण पुरस्कार तर सुधीर तावडे, संतोष तावडे, चंद्रकांत तावडे यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दहावी बारावी उत्तीर्ण तसेच उच्च पदवी उत्तीर्ण झालेल्या तावडे कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आमच्या मंडळास ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवापासून म्हणजेच १९९३ पासून मराठा गौरव या मानाच्या पुरस्काराने समाजातील निरनिराळ्या क्षेत्रात प्राविण्य व दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.