*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.भारती भाईक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंगात रंगले मी*
रंग भरण्या इंद्रधनूत
जात होतं कुणी..
ओसांडलं अलगद
*रंगमिश्रित* पाणी….
वेचित होते मी
फुले गंध *प्राजक्ताची*
जाहली वेडी धुंदी
ती *चिंब चिंब* होण्याची…
हर्षित आनंदी तो
*पीतरंग* ल्यायिले मन
*गुलबक्षी* रंगाने तर
मोहरले तनमन…
शृंगारस्थ मी मनोरम
लेऊनी *लालरंग*
*हरीत* रंगाने झाले
स्वप्न सृजनात दंग…
*नीळा जांभळा* रंग
मननभात पसरला
भाव मनीचा
उन्मुक्त झाला…
ल्यायिले निरागसता
ओसांडता *श्वेतरंग*
मधाळ स्मित उमटता
रंगात उठले *तरंग*….
*रंगात रंगले मी*
भान नुरले कसले
तत् तत् धिन् धिन्
मन मयुरासम नाचले…
सौ. भारती भाईक