You are currently viewing फाटलेले ओठ, फाटलेले टाळू शिबिराचा २१ जणांनी घेतला लाभ…

फाटलेले ओठ, फाटलेले टाळू शिबिराचा २१ जणांनी घेतला लाभ…

फाटलेले ओठ, फाटलेले टाळू शिबिराचा २१ जणांनी घेतला लाभ…

ओरोस

7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व मिशन स्माईल यांच्या संयुक्त विदयमाने फाटलेला ओठ व फाटलेला टाळूचे तपासणी शिबीर जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे पार पडले. त्यामध्ये 21 मुलांची तपासणी करण्यात आली.
मिशन स्माईल तर्फे पूर्ण भारतात आतापर्यंत ४१ हजार यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या असून त्यांचे पुढील शस्त्रक्रिया शिबिर विस्डम हॉस्पीटल पणजी गोवा येथे 18 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांचा प्रवासाचा खर्च मिशन स्माईल, कोलकाता यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.
शिबिराचे उदघाटन जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. श्याम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला व बाल रुग्णालय जनरल सर्जन डॉ मोनालिसा वजराटकर, निलेश गावडे, दयानंद कांबळी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी, मिशन स्माईल कोलकाता श्रीम तौसिफ, विश्वनाथ राव, श्रीम एकता वराडकर तसेच आरबीएस के टीम उपस्थित होते.
या शिबिरास विनायक पाटील, श्रीम नूतन तळगावकर (108 टीम) यांचे विशेष सहकार्य मिळाले.
18 फेब्रुवारीपर्यंत या प्रवर्गातील मुलांची तपासणी करण्यात येणार असून ‘मुलांच्या सुंदर हसण्याने त्यांचे भविष्य अधिक सुंदर करणेसाठी मिशन स्माईल यांच्या साथीने या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा’ असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक ९४२२३७३१८८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा