कणकवली ;
भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केलेली. या सी आर्म मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते फीत कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर, वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिलकुमार देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले- काळगे,डॉ.धनंजय रासम ,डॉक्टर हेमा तायशेटे,माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, सहाय्यक आधी सेविका सायली तिवरेकर, परिस्थिती का वंदना गायकवाड प्रशांत बुचडे फार्मासिस्ट प्रीती कोरगावकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.