शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
सन 2022-23 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी दि. 8 फेब्रुवारीर्पंयत सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.
शासन निर्णयानुसार संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता Awards) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह नमूद कालावधीमध्ये दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत.
त्यानूसार विहिती नमून्यात सूचना व हरकती सादर करावे, असे क्रीडा विभागार्फत आवाहन करण्यात येत आहे.
००००००
सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती
सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का): सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क मधील सरळसेवेतील पदांची परीक्षा टि.सी.एस – आयओएन यांच्यामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
या भरतीकरीता सविस्तर जाहिरात सूचना, सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.gov.in या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी व कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा.
तरी जिल्ह्यातील सर्व सुभेदार व समकक्ष पदावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक (आर्मी