दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ४१० धावपटूंचा सहभाग
वेंगुर्ला
दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील मिनी मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात मुली व मुलांच्या स्वतंत्र विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल ४१० धावपटूंनी सहभाग घेतला. खुल्या गटातून देवगडची प्रियांका लाड व कोचरेच्या संतोष वेंगुर्लेकरने वेगवान धावपटूचा मान मिळविला. स्पर्धेचा शुभारंभ दै. तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत व शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर व इंजिनियर विनय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम पाच पुढीलप्रमाणे – बालवाडी मुली- पूनर्वी दळवी व मिरा मिसाळ (शिवाजी प्राग.), पियुष जाधव (वजराट नं. ३), तनिषा सातार्डेकर (देसाई स्कूल वेंगुर्ला), युगा खानोकर (सिंधुदुर्ग विद्या निकेतन),
मुलगे-शिवम जाधव (शिवाजी प्राग.), महंत शेर्लेकर (वेतोरे हायस्कूल), दर्शिल शेट्ये (रेडी बालवाडी), रोहन शेख (शिवाजी प्राग.), विदीश कुडाळकर (आडेली), पहिली ते दुसरी-मुली-शायना डिसोजा (उभादांडा नं. २), हर्षिका सपकाळ (मठ कणकेवाडी), मोरिनीशा शेख (वेंगुर्ला), अदिती खांदे – (वजराट), सिद्धी जाधव (वेंगुर्ला नं. ४), मुलगे – तेजस केणी, अस्मित गिरप (वेंगुर्ला नं.१), आराध्या मिराशी (कडावल नं १), इशान फर्नांडिस, भार्गव पवार (वेंगुर्ला), तिसरी ते चौथी-मुली- दिया मालवणकर (वेंगुर्ला नं.३), अनन्या कुंभार (पाट), आदिती मिराशी (कडावल नं.१), युक्ता राणे (वजराट), सान्वी काकडे (उभादांडा नं.१), मुलगे-प्रिन्स भारती (वेंगुर्ला नं.४), मोहम्मद तौफिक व आदिन शेख (शिवाजी प्राग.), हर्षद खवणेकर (उभादांडा), वीर धोंड (शिवाजी प्राग.), पाचवी ते सातवी-मुली -महिमा मोहिते (मालवण), इंदुजा पेडणेकर (उभादांडा नं.३), आकांशा कुंभार (पाट), मान्यता पेडणेकर (वेंगुर्ला नं.३), मेहक शेख (वेंगुर्ला हाय.), मुलगे-हर्ष म्हाडदळकर (वेंगुर्ला हाय.), लखन कुबल (उभादांडा नं.३), श्रवण देवासी (वेंगुर्ला नं.३), कृष्णा पाटकर (पाट हाय.), राज प्रजापती (वेंगुर्ला हाय.), आठवी ते दहावी-मुली- सेहा तेरसे (प्रागंड हाय.), विधी परब (वेंगुर्ला हाय.), विभावरी मांजरेकर (वेंगुर्ला), आलिशा कुबल (उभादांडा हायस्कूल), आर्या कापरे (नेमळे हाय.), मुलगे-यश राणे (आडेली हाय.), चिन्मय राणे व प्रदीप प्रजापती (वेंगुर्ला हाय.), चैतन्य राणे व हर्ष परब (आडेली हाय.), खुला गट-महिला- प्रियांका लाड (देवगड), रसिका बाळकृष्ण (पारपोली), गौरी दळवी (पाट), सलोनी कांबळे (कुडाळ), लिना धुरी (मालवण), पुरुष- संतोष वेंगुर्लेकर (कोचरा), विराज भुते (उभादांडा), जयेश सावंत (भडगाव), आदित्य सुतार (पांग्रड) व भविष्य गंगावणे (कुडाळ)
जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, तालुका क्रीडा केंद्राचे प्रशिक्षक जया चुडनाईक, संजिवनी परब-चव्हाण, स्पर्धा प्रमुख ऐश्वर्या मालवणकर, महेंद्र मातोंडकर, ईशा मालवणकर, जागृती मंडळाचे प्रशांत मालवणकर, अमोल सावंत, विवेक राणे, शेखर साळगावकर, व्हळीयप्पा तलवार, सुनील चव्हाण, अमृत काणेकर, शशिकांत परब, रुपाली वेंगुर्लेकर-आचार्य, प्रतिक मालवणकर, भूषण मालवणकर, महेंद्र घाडी, रवी पांगम, पिंट्या कुडपकर, पिंट्या मालवणकर, अरविंद चव्हाण, चारुदत्त नार्वेकर, गौरेश सावंत, बाळा सावळ, नवनाथ सातार्डेकर, गोविंद सावंत, शंकर कोणेकर, विनायक मालवणकर, संग्राम सामंत, नंदलाल नार्वेकर, विवेक आरोलकर, दत्तात्रय राणे, गौरेश वायंगणकर आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.