You are currently viewing भोग प्रारब्धाचे

भोग प्रारब्धाचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भोग प्रारब्धाचे*

***************

जगी काय मिळविले

काय , किती हरविले….

 

मोजदाद कशी करावी

प्रारब्धाचे भोग भोगीले….

 

नाती सारी ऋणानुबंधी

भावबंध सारेच विरलेले….

 

मुखवट्याचे रंग बेगडी

कुणी अलवार फसविले….

 

मुसमुसणे हळवे जिव्हारी

आठव ते भिजवित राहीले….

 

हृदयी प्रतिबिंब भावनांचे

अलवार झुळझुळत राहिले….

**********************

*रचना क्र. ९ / ६ / २ / २०२४*

*”©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞( 9766544908 )*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा