You are currently viewing दंगा…!

दंगा…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर [दीपी] लिखित अप्रतिम दशपदी काव्यरचना*

वृत्त : अनलज्वाला

*दंगा…!*

 

गहाण ठेवुनि विवेक बुद्धी दंगे करतो
सामाजिक वादाचे तोची कारण बनतो

संस्काराला नको कुणाच्या ठेवू नावे
खरी कारणे रोगाची मग शोधत जावे

जाती धर्मासाठी लढणे गैर नसावे
पण सामोरी येता सारे मुक्त हसावे

प्रत्येकाचा स्वाभिमान जर जागृत असतो
तर अंगाशी येता प्रकरण का तू लपतो..?

चिथावण्या अन् भडकविणे हे झाले सोपे
बदला घेता गरिबांचे बघ जळती खोपे

© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

प्रतिक्रिया व्यक्त करा