You are currently viewing बांदा उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

बांदा उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

बांदा उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

बांदा

येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री. सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत. आज दुपारी ३ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

उपसरपंच जावेद खतीब यांनी पक्षीय धोरणनुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी नामनिर्देशन दाखल करताना सत्ताधारी भाजपच्या वतीने श्री सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. बांदा ग्रामपंचायतमध्ये भाजपची गेली ३० वर्षे निर्विवाद एकहाती सत्ता आहे. भाजपचे बारा सदस्य असून शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे उपसरपंच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. विरोधकांकाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने श्री सावंत यांची बिनविरोध निवड झाली. श्री सावंत हे प्रभाग क्रमांक चारचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपल्या प्रभागात एक ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आणला आहे.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक, मावळते उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, श्यामसुंदर मांजरेकर, रुपाली शिरसाठ, देवल येडवे, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, रिया येडवे, शिल्पा परब यांच्यासह गजानन मोर्ये, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांनी काम पहिले.

यावेळी बोलताना बाळु सावंत म्हणाले की, बांदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू. पक्षीय भेदाभेद न ठेवता सर्वाना सोबत घेऊन काम करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा