महासंस्कृती महोत्सवात नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ चे होणार सादरीकरण…
सिंधुदुर्गनगरी
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘महासंस्कृती महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात उद्या ७ फेब्रुवारी रोजी शाहीर नंदेश उमप यांचे ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप त्यांच्या 35 जणांच्या संचासह महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा सादर करणार आहेत. यामध्ये गोंधळ, भारुड, बतावणी आणि पोवाडा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथेचे सादरीकरण होणार आहे.
हा कार्यक्रम डॉ. स्वार हॉस्पीटल समोरील मैदान, सावंतवाडी येथे ठीक ६ वाजता सुरू होणार असून ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.