सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून ७०० हून अधिकांना रोजगार देणार – सुनील राऊळ
सन्मान नारीशक्तीचा उपक्रमा अंतर्गत महिलांना ५ लाखापर्यंत कर्ज
सावंतवाडी
सैनिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील दोघांना असा जिल्ह्यातील ७०० हून अधिकांना रोजगार देण्याचा विचार आहे. त्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न सुटेल व ग्रामीण भागातील ग्राहक पतसंस्थेची जोडले जातील हा उद्देश आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी दिली.
दरम्यान या अभियानांतर्गत सन्मान नारीशक्तीचा या उपक्रमांतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण अंतर्गत महिलांना कर्ज पुरवठा व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे संस्थेच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे आदी उपस्थित होते.
‘कुटुंबाची आर्थिक सक्षमता हीच आमची प्राथमिकता ‘ असे ब्रीद घेऊन पुढील काळात आम्ही काम करणार आहोत, असेही ते म्हणाले. ‘सैनिक पतसंस्था आपल्या गावी ‘ या उपक्रमांतर्गत दरवर्षी २० प्रमाणे गाव जोडत जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात सैनिक पतसंस्था पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. व्हीजन २०३० अंतर्गत २०३० पर्यंत या संस्थेचे डिपॉझिट तब्बल ७०० ते ८०० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सैनिक पतसंस्थेच्या जिल्ह्यात २० शाखा असून या २० शाखांच्या माध्यमातून वीस गावांची निवड करण्यात येणार आहे. त्या २० गावांमधील महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सन्मान नारीशक्तीचा या माध्यमातून पतसंस्थेच्या हिरकणी कर्ज योजनेतून महिलांना ३ ते ५ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. यामधून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण हा पतसंस्थेचा उद्देश असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये पतसंस्थेचे एजंट नियुक्त करणार आहेत. त्या माध्यमातून पतसंस्थेच्या विविध योजना मार्केटमध्ये पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. या द्वारे आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील ५०० ते ७०० युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*