*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सत्कर्म*
*षडाक्षरी*
ईश्वरी नियम
कर्म तसे फळ
सत्कर्म करुनी
अंगी आण बळ……१
आपुले नशीब
आपुल्या हातात
ध्यानी असू द्दावे
असते कष्टात……२
संचिताचा साठा
सदाचारी वृत्ती
अंतरात येई
निर्मळ प्रवृत्ती……३
शुध्द वर्तनाने
नशीब फळते
त्याच्या कृपेमुळे
सर्वची मिळते……४
कर्म संचितांनी
घडते नशीब
देव चित्रगुप्त
ठेवतो हिशोब……५
असू द्यावे ध्यानी
जसे पेरशील
भाग्य तुझ्या हाती
तसे भोगशील……६
उद्याचे संचित
आजचे सत्कर्म
जीवनाचे साधे
जाणावेस मर्म……७
डॉ दक्षा पंडित
दादर,मुंबई