You are currently viewing देऊळवाडा येथे दुचाकी-कार अपघातात लादी कामगार जागीच ठार

देऊळवाडा येथे दुचाकी-कार अपघातात लादी कामगार जागीच ठार

देऊळवाडा येथे दुचाकी-कार अपघातात लादी कामगार जागीच ठार…

मालवण

दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संजीवकुमार मोहनराय यादव (वय-२०) रा. बिहार या लादी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या दरम्यान देऊळवाडा येथील वळणाच्या रस्त्यावर घडला.

यात दुचाकीच्या मागे बसलेला मुन्नी कुमार राम याच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की लादी काम करणारा संजीव कुमार मोहन राय यादव व मुन्नी कुमार राम हे दोघेही सायंकाळी कुंभारमाठ येथून दुचाकीने भरधाव वेगाने मालवणच्या दिशेने येत होते. यात देऊळवाडा येथील वळणाच्या रस्त्यावर ते आले असता समोरून येणाऱ्या नांदेडच्या पर्यटकांच्या कारला त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संजीव कुमार यादव व मुन्नी कुमार राम हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात संजीव कुमार यादव यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या मुन्नी राम याच्या हाताला दुखापत झाली. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेस प्राचारण करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, जिल्हा वाहतूक शाखेचे दीपक तारी, महेंद्र देऊलकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, विलास टेंबुलकर, सुशांत पवार, गुरुप्रसाद परब, राजन पाटील, महादेव घागरे यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने गेल्यानेच हा अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा