You are currently viewing “स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश!” – डॉ. नेहा बेलसरे

“स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश!” – डॉ. नेहा बेलसरे

*”स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश!” – डॉ. नेहा बेलसरे*

पिंपरी

“सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास निश्चितच भरघोस यश प्राप्त होते!” असा कानमंत्र पुणे येथील डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात डॉ. नेहा बेलसरे बोलत होत्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) यूथ एम्पॉवरमेंट चेअरपर्सन ला प्रदीप कुलकर्णी, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन उज्ज्वला कुलकर्णी, रिजनल चेअरपर्सन धनराज मंगनानी, समन्वयक अनुजा करवडे, सुनील चेकर, अशोक मिस्त्री, फीनिक्स क्लबच्या अध्यक्ष रजनी देशपांडे, पिंपरी – चिंचवड महापालिका मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नेहा बेलसरे पुढे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप, व्यायाम अथवा खेळ, चौरस आहार आणि अभ्यास यांचे वेळापत्रक तयार करावे म्हणजे परीक्षेचा ताण जाणवणार नाही.‌ विविध क्षेत्रांतील अनेक मोठ्या व्यक्तींनी वेळेचे काटेकोर नियोजन केल्यामुळे ते जीवनात यशस्वी झाले!” ओमप्रकाश पेठे यांनी, “विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त क्षमतेचा पुरेपूर वापर करावा!” असा सल्ला दिला. नीलकंठ पोमण यांनी, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे!” अशी ग्वाही दिली. प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून, “जिंकणे म्हणजे कायम प्रथम क्रमांक मिळविणे नव्हे; तर शर्यतीचा प्रवास सुलभ करण्यासाठी केलेले प्रयत्नसुद्धा यशाकडे घेऊन जातात!” अशा शब्दांतून ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मोफत सराव प्रश्नसंचाचे प्रकाशन करण्यात आले.

‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या एस एस सी बोर्ड पाठ्यपुस्तक मंडळ सदस्यांकडून विशेष मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये डॉ. सुलभा विधाते यांनी गणित आणि डॉ. जयश्री अत्रे यांनी शास्त्र विषयांवर अतिशय उपयुक्त सूचना आणि अभ्यासविषयक सुलभ क्लृप्त्या सांगत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. अर्चिता मडके यांनी आपल्या निवेदनातून तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधताना संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १८ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणार असल्याची माहिती दिली.

दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.‌ परिसरातील बारा शाळांमधील सुमारे ११५० विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२)च्या सुमारे १९ क्लबच्या सभासदांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. उज्ज्वला कुलकर्णी आणि अनुजा करवडे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा