You are currently viewing माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत जमवलेल्या गर्दीत पत्रकार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत जमवलेल्या गर्दीत पत्रकार

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना वृत्त संकलनासाठी बैठक व्यवस्था नाही*

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी हे राज्यातील सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. राजाश्रय लाभलेल्या सावंतवाडी शहरात आजपर्यंत दिग्गज राजकीय नेत्यांच्या कितीतरी सभा पार पडल्या परंतु, उबाठा सेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची सभा मात्र काहीशी वेगळीच असल्याचे चित्र समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेत पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी वेगळ्या बैठक व्यवस्थेचे नियोजन केले नसून पत्रकारांना सभेसाठी जमलेल्या नागरिकांमध्येच बसविण्यात आले आहे. त्यामुळे सभेसाठी जमवलेल्या गर्दीत उभे पत्रकार अशी परिस्थिती असून पत्रकारांच्या वृत्त संकलनामध्ये अडचणी निर्माण झाल्या.

कोणतीही राजकीय सभा असो अथवा समारंभ त्या ठिकाणी पत्रकारांना वृत्त संकलनासाठी वेगळी बैठक व्यवस्था केलेली असते. त्यामुळे वृत्त संकलन करणे व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करणे इत्यादी कामे निर्विघ्नपणे पार पाडत असतात. परंतु आजच्या सावंतवाडीतील उद्धव ठाकरे यांच्या सभेत मात्र वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना वेगळी बैठक व्यवस्था का केली गेली नाही हे मात्र गुलदस्त्यात राहिले. सुरक्षिततेच्या नावाखाली सभेचे वृत्त संकलन करण्यासाठी पत्रकारांना बैठक व्यवस्था केली गेली नसल्याचे समजले परंतु आजपर्यंत अशा प्रकारचे अशा प्रकारचा व्यवहार कोणत्याही मोठ्या नेत्याच्या सभेत पत्रकारांसोबत झाल्याचे ऐकिवात नाही. परिणामी उद्धव ठाकरे यांची सभा ही इतर राजकीय नेत्यांच्या सभेपेक्षा वेगळी आहे की काय..?? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा