You are currently viewing सबका मालिक एक

सबका मालिक एक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सबका मालिक एक*

 

शिर्डीचे श्री साईबाबा सर्व भक्तांना काय सांगत असत? तर “सबका मालिक एक है”! खरंच आहे ना हे? देव म्हणजे काय हो?

परमेश्वर, ईश्वर, भगवान! अहो हे एक परमतत्व आहे, अतिशय चैतन्यमय शक्ती आहे, ऊर्जा आहे. असे असताना या शक्तीला जात-पात, धर्म कसा असू शकतो?

यवनांचा अल्ला असेल, ख्रिश्चनांचा आकाशातील बाप असेल नाहीतर हिंदूंचा भगवंत असेल, भक्ताचे कल्याण करणे, त्याचे संकटातून निवारण करणे, त्यांना सन्मार्ग दाखवणे, सतत त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच त्या शक्तीचे कार्य आहे.

अति पर्जन्यवृष्टीमुळे घाबरलेल्या नगरवासीयांवर श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्याचे छत्र धरले होते, आणि भयभितांचे रक्षण केले होते, ही पुराणातील कथा आपण सर्वच जाणतो. यावरूनच मला आठवण आली ती साधारण १९७४/ ७५ मध्ये आम्ही केलेल्या प्रवासाची. माझे यजमान, मी आणि दोन मुले, (मुले तेव्हा बरीच लहान होती)

असे चौघेजण शिर्डीला गेलो होतो. दोन दिवस तिथे आमचा मुक्काम होता. निघायच्या दिवशी आम्ही राहात असलेल्या ब्लॉक मधील वॉश बेसिन माझ्या मुलाच्या हातून फुटले. तो काहीतरी बेसिन वर जोर देऊन, पाय उंच करून आरशात बघून भांग पाडण्याचा प्रयत्न करत होता, आणि खळकन बेसिन पडून फुटले. ही घटना नोंदविण्यासाठी शिर्डी संस्थानाच्या कार्यालयात आम्ही गेलो आणि घटना निवेदन केली. त्यांनी आम्हाला रुपये २०० भरावयास सांगितले. शिर्डीहून आणखी दोन चार ठिकाणी आम्हाला प्रवास करायचा असल्यामुळे एकदम दोनशे रुपये रोख देणे जरा अवघड वाटले. (त्यावेळी दोनशे रुपयाला बरीच किंमत होती) बरे त्यावेळी एटीएम, क्रेडिट डेबिट कार्ड, हेही काही आपल्याकडे नव्हते. चेक घेण्यास त्यांनी नाकारले. पण परमेश्वर आहे ना? ” साहेब तुम्ही चांगले दिसता, तुम्ही फसवणार नाही याची खात्री वाटते. काही चिंता करू नका. सर्व प्रवास नीट करा आणि घरी पोहोचल्यानंतर

सावकाश दोनशे रुपयांची मनी ऑर्डर करा. ” त्या रोखपालाचे हे बोलणे ऐकून आम्हाला खूप हायसे वाटले. घरी परत आल्यावर माझ्या यजमानानी मनी ऑर्डर पाठवली

आणि काय आश्चर्य!परत येत असताना एअरपोर्टच्या त्या मोकळ्या जागेत, गवतामध्ये शंभराच्या दोन नोटा माझ्या मिस्टरांना सापडल्या. आजूबाजूला कोणीही नव्हते.

साईबाबांनीच लहान मुलाच्या चुकीला शिक्षा काय करायची? म्हणूनच जणू काही ते पैसे स्वीकारले नसावेत असे वाटून यजमान घरी आले.

हे सर्व सांगण्याचे तात्पर्य एवढेच वेगवेगळ्या रुपात देव उभा असतो आणि गरजूंना वेळोवेळी मदत करत असतो.

पुराणातील अनेक कथांवरून माणसानेच स्वतःच्या सोयीसाठी गणपती, शिवशंकर, विष्णू, दत्तप्रभू, पांडुरंग विठ्ठल अशी देवांची वेगवेगळी रूपे बनविली आहेत. त्या एका निर्गुण निराकार देवाला आपण माणसांनीच आपल्या सोयीसाठी सगुण साकार केले आहे.

देव हा सर्वत्र एकच असून त्यानेच या विश्वाची निर्मिती केली आहे,तोच स्थिती लय कर्ता आहे.

संपूर्ण आसमंत ही ईश्वरी शक्ती व्यापून आहे.

रात्रीच्या शांत वेळी समुद्राची गाज ऐकताना मनाला एक प्रकारचे स्थैर्य आल्यासारखे वाटते. सकाळी उगवत्या सूर्याचे दर्शन घेताना कसे प्रसन्न आणि शांत वाटते. पक्षांच्या चिव चिवटाने अंग शहारून येते. आंब्याच्या झाडावरचे कोकीळ कूजन ऐकून मन भारावते. रंगीबेरंगी सुगंधी फुले पाहून आनंद वाटतो. प्राजक्ताच्या सड्याचा सर्वत्र दरवळ पसरतो.

हे असे का? याचे कारण एकच या अवघ्या चराचरात एका देवाचा वास आहे.

काही दिवसांपूर्वी मला आलेला एक अनुभव मी सांगते. अगदी साधा. मला रस्त्याच्या एका बाजूने क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचे होते. दोन्ही बाजूने इतक्या गाड्या धावत होत्या, आणि थांबायला कोणीच तयार नव्हते. थोडा ट्राफिक कमी झाल्यासारखे वाटल्याने मी कसाबसा अर्धा रस्ता ओलांडला आणि पुढे जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या मध्यावर बराच वेळ तशीच उभी राहिले. काही वेळाने एका माणसाने माझ्या दंडाला पकडले आणि” आजी घाबरू नका, या लोकांना काही चाडच नाही, ते कधीच थांबणार नाहीत, चला माझ्याबरोबर” असे बोलून मला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे आणले. मी त्याचे आभार मानणार तेवढ्यात तो निघूनही गेला, पार दिसेनासा झाला. माझ्या मनात विचार आला, या माणसातल्या देवानेच मला रस्ता पार करण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने मदत केली. त्यावेळी मला स्वामी समर्थांची आठवण आली. ते सांगत असत, “भिऊ नकोस, मी पाठीशी उभा आहे”. तर असा असतो हा देव! सतत मदत करणारा, अभय देणारा, माणुसकीचा धर्म शिकविणारा.

गीता आपल्याला काय सांगते? गीता हेच सांगते की प्रत्येकाच्या शरीरात कृष्ण तत्वाचा वास आहे. प्रत्येक सजीवाच्या हातून जे कर्म घडताना आपण पाहतो ते प्रत्यक्ष कृष्ण तत्वाकडूनच घडत असते. आपले शरीर हे फक्त साधन आहे. कर्ता करविता तो एक देवच आहे.

अर्जुनाने विश्वरूप दर्शनात काय पाहिले? या कृष्णाने दाही दिशा व्यापलेल्याच दिसल्या नाही का त्याला?

*मूकम् करोती वाचालम्*

*पंगूम् लंघयते गिरीम्*

*यत्कृपा त्वमहं वंदे*

*परमानंद माधवम्*

माधवाची, केशवाची एकदा कृपा झाली तर मुक्या माणसालाही वाचा फुटेल, पांगळा मनुष्य डोंगर चढू शकेल. अशक्य ते शक्य होईल. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

*एक तत्त्व नाम दृढ धरी मना*

*हरीसी करुणा येईल तुझी*

*ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद*

*वाचेशी सद्गद जपे आधी*

*नामा परते तत्त्व नाही रे अन्यथा*

*वाया आणि का पंथा जासी झणे*

डोळ्यासमोर कोणत्याही देवाची मूर्ति असू दे, पण तुमच्या मनात या

नामाचे एकच तत्व दृढ असू द्यावे म्हणजे त्या हरीला त्याच्या भक्ताची करुणा आल्याशिवाय राहणार नाही.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी*

 

*Advt Link 👇*

————————————————

 

चला *फणस* रूपी कोकणच्या *पिवळ्या धम्मक सोन्याचे* नानाविध स्वादिष्ट पौष्टिक, आरोग्यदायी असे *मौल्यवान दागिने* घडवूया.

 

फणस हे सर्वात *आरोग्यदायी* आणि *बहुमोली* असलेलं फळ आहे. खरंतर भाजी आणि फळ या दोन्ही प्रकारात फणस मोडला जातो.

 

*डायबेटिस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, अस्थमा, वेट लॉस, डोळ्यांचे विकार, त्वचेचे आजार अशा अनेक समस्यांवर फणस खूपच उपयुक्त असल्याचे त्यावर झालेल्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे.*

 

फणसामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर, अँटी ऑक्सीडन्ट्स अशा विविध आरोग्यदायी घटकांचा समावेश असल्याने वैद्यकीय दृष्टीने फणसाचं महत्व जास्तच वाढलं आहे.

 

कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, त्याच्या आठळ्या व चारखंड यापासून खूप सारे प्रॉडक्ट्स बनवता येतात आणि त्याचा आस्वाद विविध माध्यमातून घेता येतो, सेवन करता येते.

 

कच्चा गऱ्यांची पावडर, आठळ्यांची पावडर, चारखंड पावडर यांना प्रचंड मागणी असून विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो.

 

*फणसाचे जॅम, जेली, सरबत, चॉकलेट, केक, आइस्क्रीम, श्रीखंड, खीर, बिस्किट्स, लोणची, भाज्या, वेगन मीट, बिर्याणी, सूप, मंचुरीयन, टिक्का, चिली असे खूप सारे प्रॉडक्ट्स तयार करता येतात.*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने फणसापासून विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवण्याचे 3 दिवसीय *प्रॅक्टिकल प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

*कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण सकाळी 10 ते 5 या वेळेत संपन्न होणार आहे.*

 

या प्रशिक्षण शिबिरासाठी *पूर्व नोंदणी* करणे आवश्यक आहे.

 

नाव नोंदणीसाठी आणि या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी JACK असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा

 

*Jack Magic*

 

-फणस प्रक्रिया प्रशिक्षण*

 

*9-10-11 फेब्रुवारी*

 

*कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

*टीम अभिनव*

 

8767473619

 

*अभिनव Jackfruit मिशन*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा