You are currently viewing कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी

कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी

चला *फणस* रूपी कोकणच्या *पिवळ्या धम्मक सोन्याचे* नानाविध स्वादिष्ट पौष्टिक, आरोग्यदायी असे *मौल्यवान दागिने* घडवूया.

 

फणस हे सर्वात *आरोग्यदायी* आणि *बहुमोली* असलेलं फळ आहे. खरंतर भाजी आणि फळ या दोन्ही प्रकारात फणस मोडला जातो.

 

*डायबेटिस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, अस्थमा, वेट लॉस, डोळ्यांचे विकार, त्वचेचे आजार अशा अनेक समस्यांवर फणस खूपच उपयुक्त असल्याचे त्यावर झालेल्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे.*

 

फणसामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर, अँटी ऑक्सीडन्ट्स अशा विविध आरोग्यदायी घटकांचा समावेश असल्याने वैद्यकीय दृष्टीने फणसाचं महत्व जास्तच वाढलं आहे.

 

कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, त्याच्या आठळ्या व चारखंड यापासून खूप सारे प्रॉडक्ट्स बनवता येतात आणि त्याचा आस्वाद विविध माध्यमातून घेता येतो, सेवन करता येते.

 

कच्चा गऱ्यांची पावडर, आठळ्यांची पावडर, चारखंड पावडर यांना प्रचंड मागणी असून विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो.

 

*फणसाचे जॅम, जेली, सरबत, चॉकलेट, केक, आइस्क्रीम, श्रीखंड, खीर, बिस्किट्स, लोणची, भाज्या, वेगन मीट, बिर्याणी, सूप, मंचुरीयन, टिक्का, चिली असे खूप सारे प्रॉडक्ट्स तयार करता येतात.*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने फणसापासून विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवण्याचे 3 दिवसीय *प्रॅक्टिकल प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

*कुडाळ येथे 9-10-11 फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण सकाळी 10 ते 5 या वेळेत संपन्न होणार आहे.*

 

या प्रशिक्षण शिबिरासाठी *पूर्व नोंदणी* करणे आवश्यक आहे.

 

नाव नोंदणीसाठी आणि या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी JACK असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवावा.

 

*Jack Magic*

-फणस प्रक्रिया प्रशिक्षण*

*9-10-11 फेब्रुवारी*

*कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

*टीम अभिनव*

8767473619

 

*अभिनव Jackfruit मिशन*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा