उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादी करणार उद्या बांद्यात जल्लोषी स्वागत
उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आवाहन
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणार्या माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे राष्ट्रवादीच्या मुळ गटाकडून उद्या बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. दरम्यान यावेळी ठाकरे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.