*आमदार वैभव नाईक यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा*
कुडाळ :
शिवसेना कार्यप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे रविवारी दुपारी २ वाजता कुडाळ येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिजामाता चौक येथे होणाऱ्या कॉर्नर सभे संदर्भात व वाहतूक व्यवस्थेत संदर्भात पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन बोभाटे, बाळा कोरगावकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर, सचिन काळप, दीपक आंगणे, नगरसेविका श्रुती वर्दम, श्रेया गावंडे, ज्योती जळवी, सई काळप, स्नेहा दळवी, श्रेया परब आदी उपस्थित होते.
उद्या ४ फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. यावेळी आरएसएन हॉटेल ते जिजामाता चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिजामाता चौक येथील मोकळ्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कॉर्नर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पोलीस प्रशासन व आमदार वैभव नाईक यांनी उद्या होणाऱ्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाहणी करून आढावा घेतला.