You are currently viewing मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश

मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश

*मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश*

*युती सरकारचे सिंधुदुर्ग जिल्हा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी मानले आभार*

*सिंधुदुर्गनगरी-*

मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश झाला या समावेशामुळे समाजातील घरापासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना नक्कीच फायदा होईल,या योजनेत विमुक्त जाती भटक्या जमातींचा समावेश केल्याबद्दल युती सरकारचे प्रसिद्धपत्रकाद्वारे भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आभार मानले. समावेश केल्याबद्दलचा शासन निर्णय 30 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धी करण्यात आला आहे.सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा. उपमुख्यमंत्री (वित्त) महोदय यांनी. ०९ मार्च, २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ करीताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मार्गासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बाांधण्यासाठी नवीन “मोदी आवास घरकुल योजना” सुरु करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील, यापैकी ३ लाख घरे ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३- २४ या पहिल्या वर्षात पुर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने इतर मार्गास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी “मोदी आवास घरकुल योजना”राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दि. २१.०७.२०२३ रोजी मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय इतर मार्गास बहुजन कल्याण ववभार्ग क्र.वर्गृयो- २०२३/प्र.क्र.३३/योजना-५, दि.२८.०७.२०२३ निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
तथापि विविध स्तरावरुन “मोदी आवास” घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती. त्या अनुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गा सोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये करण्यास वर्गृयो-2023/प्र.क्र.33/योजना-5 या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णय इतर मार्गास बहुजन कल्याण विभाग क्र.वर्गृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थी यांना लागू राहतील. सदर योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेंचा लाभ घेतलेला नसावा. या अटी शर्ती वरती या योजनेमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज बांधवांनी अटी शर्तीला बांधील राहून लाभ घ्यावा तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरून या योजनेचा लाभार्थ्यांपर्यंत प्रचार होऊन योग्य ते प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा