ओरोस :
आज 2 फेब्रुवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत एस एस पी एम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले व आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
या शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथील सर्व मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, तसेच डॉक्टर सुमित कांबळे व त्यांची टीम मार्फत करण्यात आले.