*मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व चेंबूर-तुर्भे शिक्षण संस्थेचा संयुक्त उपक्रम*
मुंबई :
मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व चेंबूर तुर्भे शिक्षणसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने, ना. ग. आचार्य व दा. कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर येथे दु.०३.०० ते सायं. ०७.०० या वेळेत शनिवार दि.१० व रविवार दि. ११ फेब्रु.२०२४ या दोन्ही दिवशी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी श्री. प्रमोद जाधव दिग्दर्शित ‘कारगीलची शौर्यगाथा’, सुप्रसिद्ध लेखक कवी गीतकार श्री. प्रवीण दवणे यांचा ‘दीपस्तंभ मनातले आणि जनातले’ तसेच दुसऱ्या दिवशी श्रीम. अनघा मोडक यांचा ‘शूरा मी वंदिले’ व कविवर्य अशोक नायगांवकर व श्री.अरुण म्हात्रे यांचा ‘कवितेच्या वाटेवर.. कविता किस्से’ इत्यादी कार्यक्रमांची साहित्यिक पर्वणी ठेवली आहे. साहित्य रसिकांनी या पर्वणीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही संस्थांनी केले आहे.