*तळवडे येथील वीज ग्राहकांच्या जाणून घेणार समस्या*
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तळवडे विभागीय बैठक शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. ग्रामपंचायत हॉल तळवडे येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत तळवडे सह आजूबाजूच्या गावातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातून कोणीही त्याबद्दल आवाज उठवत नसल्याने महावितरण कंपनी सुशेगाद आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी व वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी सदर बैठकीला लिखित स्वरूपात तक्रार अर्ज घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड व नारायण जाधव अध्यक्ष तंटामुक्ती समिती तळवडे यांनी केले आहे.