You are currently viewing रोहित पवारांच्या “ईडी” चौकशी विरोधात सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे तालुका व जिल्हास्तरावर निषेध आंदोलन

रोहित पवारांच्या “ईडी” चौकशी विरोधात सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे तालुका व जिल्हास्तरावर निषेध आंदोलन

रोहित पवारांच्या “ईडी” चौकशी विरोधात सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे तालुका व जिल्हास्तरावर निषेध आंदोलन

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या सुरू झालेल्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक बनली आहे. या विरोधात आज जिल्हा आणि तालुका स्तरावर निषेध आंदोलन करून प्रशासनाला निवेदने देण्यात आली. जिल्हा स्तरावर निषेध करीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भास्कर परब, शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर, रुपेश जाधव, सचिन पाटकर, सच्चिदानंद कन्याळकर, दिवाकर मुरकर, नयन गावडे, शंकर चिंदरकर, चंद्रकांत नाईक, बबलू गावडे, विनायक गावडे, अक्षय मराठे, प्रसाद गावडे, गौरव गावडे, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते. सुरुवातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी तावडे यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा