You are currently viewing अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून सिंधुदुर्गात ठिय्या आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून सिंधुदुर्गात ठिय्या आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून सिंधुदुर्गात ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग

संप कालावधीत ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे त्यांना कामावर घेण्याची मागणी मान्य होऊ न ही जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी आदेश मानत नाहीत. या विरोधात अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आजपासून ठिय्या आंदोलनाची घोषणा केली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तेथून न उठण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

अंगणवाडी कर्मचारी महासभेच्या नेत्या कमल परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकार याची माहिती दिली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 57 दिवसाचा संप संपला यामध्ये संपर्क कालावधीत ज्यांना कामावरून कमी केले त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा घेण्याची अट शासनाने मान्य केली मात्र कार्यक्रम अधिकारी श्री भोसले व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे टाळाटाळ करत असल्याचे कमल परुळेकर यांनी नमूद केले आहे

यामुळे संप कालावधीत बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कामावर घेतले जात नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या कार्यालया समोरून उठणारच नाही असा निर्धार कमल परुळेकर यांनी केला आहे.

जिल्हा कार्यक्रमाधिकारी भोसले हे स्वतःचे नियम राबवून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेचे म्हणणे आहे. प्रजीत नायर यांच्या बाबतही अंगणवाडी कर्मचारी सभेची नाराजी असून त्यांच्या बदलीवर अंगणवाडी कर्मचारी सभेने आनंद व्यक्त केला आहे. भोसले यांचीही जिल्ह्यातून अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी वारंवार होत असून भोसलेंवर कारवाई करा असे पत्रही सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना संघटनेतर्फे यापूर्वी दिले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा