You are currently viewing बार कौन्सिल राज्य अध्यक्ष पारिजात पांडे यांचे कणकवली वकील संघाकडून स्वागत

बार कौन्सिल राज्य अध्यक्ष पारिजात पांडे यांचे कणकवली वकील संघाकडून स्वागत

कणकवली :

 

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा चे अध्यक्ष श्री पारिजात पांडे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवली तालुका वकील संघाची त्यांनी कणकवली येथे भेट घेतली. वकिलांना येणाऱ्या अडचणींबाबत यावेळी सर्वांगीण चर्चा झाली. ही बैठक वकील उमेश सावंत यांच्या निवासस्थानी पार पडली.

यावेळी कणकवली तालुका वकील संघ अध्यक्ष अनिल बर्वे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य वकील संग्राम देसाई, कायदा सेलचे भाजपा जिल्हा संयोजक वकील राजेश परुळेकर,वकील उमेश सावंत, वकील राजेंद्र रावराणे,वकील विलास परब ,वकील स्वप्निल सावंत, वकील प्रसन्न सावंत,वकील मिलिंद सावंत, यांच्या सह अनेक वकील आणि संघटना सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा