You are currently viewing विठू माऊली

विठू माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*विठू माऊली*

✍️✍️✍️✍️✍️✍️

 

भक्तांची साजिरी|धन्य ती नगरी|

विठूची पंढरी| माहेरच ||1||

 

करावी नेहमी|आषाढीची वारी|

भक्ता सुख भारी|वारकरी||2||

 

मूर्ती ही साजिरी|कर कटेवरी|

लक्ष भक्तांवरी |ठेऊनिया||3||

 

हार हा तुळशी|गळ्यात घालीशी|

संतुष्ट भक्तीशी| पांडुरंगा||4||

 

टाळ नी मृदुंग|वीणा व सारंग|

रंगला अभंग |विठुराया||5||

 

देव ही माऊली|ओढ ही लागली||

पाऊले चालली |भेटण्यास||6||

 

मुक्तीसाठी असा |भक्तिरस प्यावा|

मोक्ष हा साधावा |वंदू म्हणे||7||

 

✍️✍️✍️✍️✍️✍️

श्रीमती वंदना पाटकरी

(शिक्षिका )

डॉ विजयरावं व्ही. रंधे इंग्लिश मेडीयम स्कूल

*ता.शिरपूर.जि. धुळे*

‌‌

प्रतिक्रिया व्यक्त करा