*शिवसेना कार्यालयात सिंधुरत्न योजनेचे फॉर्म उपलब्ध…*
*कणकवली*
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेतली.कुडाळ मालवण मधील सिंधूरत्न योजना लाभार्थी यांचा आढावा घेण्यात आला.यावेळी सिंधुरत्न योजनेचे अधिकारी श्री.आनंद तेंडुलकर यांनी सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये कोणते लाभार्थी लाभासाठी पात्र असतील याविषयी विस्तृत माहिती सांगितली सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये अंड्यावरील कुकुटपक्षी योजना, शेळी मेंढी पालन,दुधाळ जनावरे पुरवठा योजना,शेळीगट योजना,न्याहारी निवास योजना,फूड सेकुरिटी आर्मी प्रशिक्षण योजना,बचतगटांना अन्न प्रक्रिया उद्योग पिशवीतील वस्तू विक्रीसाठी 75% सबसिडी,आदी योजना संदर्भात सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अधिकारी श्री.आनंद तेंडुलकर यांनी माहिती दिली.यावेळी कुडाळ मालवण मधील या योजनेचे अर्ज शिवसेना कार्यालयात श्री.संतोष परब,मोबाईल नंबर ९३७०९८३००३ यांच्याजवळ उपलब्ध आहेत.*या योजनेतील सर्व लाभार्थी यांना सिंधुरत्न समृद्धी योजनेसाठी सिंधुरत्न समिती अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार मंजुरी मिळणार आहे* तरी सर्व लाभार्थी यांनी शिवसेना कार्यालयात श्री.संतोष परब,यांना संपर्क करून जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.यावेळी शिवसेना शिष्टमंडळाला वेळ दिल्याबद्दल शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अधिकारी श्री.आनंद तेंडुलकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*