*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्री गणराय”*
गणरायाला करु पहिले वंदन
प्रकृती संस्कृती मांगल्याचे दर्शनIIधृII
हिरे जडित मुकुट दिसे शोभून
रत्नहार कंठी राहे विलसून
रुंद कटीवर सर्प खेळे राहून
भाळी कुमकुम विराजे अंगी चंदनII1II
अकार उकार मकार जन्मस्थान
देवाधिदेव गणांचा गणपती सन्मान
रिद्धीसिद्धी उभ्या दासी कर जोडून
चौदा विद्या चौसष्ठ कलादी निपूणII2II
बंधू कार्तिकेय शोभे शिवनंदन
लाभे पार्वतीमाता तू भाग्यवान
सर्व पुजांत तव राहे अग्रमान
पूजा करिती पत्री दुर्वांकुर वाहूनII3II
सर्वसमावेशक तू सर्व प्रिय जन
देशोदेशी भजती तुज आवडीनं
बहुभुजा अनेक नामें रुपे लेऊन
भालचंद्र वरद गणेश गजाननII4II
वाणी शुद्ध करी ऑमकार उच्चारण
वाढवी स्मरणशक्ती करिता पठण
मिळे स्वास्थ्य आरोग्य ज्ञान विज्ञापन
प्रार्थना करीतो करावे विश्वकल्याणII5II
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677