*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ३८*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
एक हृद्य प्रसंग पूर्वी घडला . वरतंतु ऋषिंचा आश्रम . निसर्गरम्यता तर पावलोपावली ! त्यांचा शिष्य कौत्स . कौत्साचे शिक्षण पूर्ण झाले . तो गुरुंना वंदन करुन घरी जाण्याची अनुज्ञा घेत होता . गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय घरी जाण्याची परवानगी दिली गुरुंनी . आणि शिष्य म्हणत होता की दक्षिणा दिल्याशिवाय कसा जावू ? गुरुंची माया होती सगळ्यांवर तशी कौत्सावर ! परिस्थिती माहित असतांना अडवू नाही म्हणून कौत्सास मोकळीक दिली , पण कौत्साचाही भाव गुरुंवर व गुरुवचनांवर ! म्हणून तो ही अडला दक्षिणा देण्यासाठी ! शेवटी गुरु म्हणाले , ” चौदा कोटि सुवर्ण मुद्रा आणून द्याव्या ! ” ( गुरुंना असे वाटले की हा नाही म्हणून तरी घरी जाईल ! ) पण न ऐकेल तर तो शिष्य कसला !! तो आश्रमातून थेट रघुराजाचे दरबारी गेला याचक बनून ! राजा विचारता झाला , काय हवे ? ” चौदा कोटि सुवर्णमुद्रा ! ” उत्तर आले . कोशात तर एवढी रक्कमच नव्हती ! राजाने थेट स्वारी केली कुबेरावर . कुबेराने घाबरुन बरेच धनाची वर्षाच केली . राजाने दरबारात येवून सगळे धन कौत्सापुढे ठेवले व सांगितले , सगळे घेवून जा ?!! असे कधी घडले असेल का माझ्या संस्कृतीशिवाय ? कौत्स म्हणाला , मला काय करायचे येवढे धन ? मी मागितले तेवढेच घेवून जाईन !!!! राजा म्हणायचा ” दिलेले दान परत घेवून कोशागारात कसे ठेवायचे ? शेवटी चौदा कोटिच सुवर्ण मुद्रा घेवून तो आश्रमी आला . गुरुंचे चरणी ते धन त्याने ठेवले व कृतार्थ झाला . या येवढ्याशा कथेतून १)दक्षिणा दिल्याशिवाय आश्रमातून निघू नाही . २) याचना केले तेवढेच घ्यावे . ३) याचक रिकाम्या हाताने जावू नये , ४) जेवढे जिंकले तेवढे दान ! ५)परस्पर भाव ठेवून जगावे , कुणी ही मोठा नाही व कुणी ही लहान नाही ! . या पाच गोष्टी तर महत्वाच्याच ! प्रत्येकाने शिकाव्या अशा आहेत . आणि गुरुशिष्यांवर एक वेद तयार होईल इतक्या कथा भारतात घडल्या आहेत हृदयास भिडणार्या !!
विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹