जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करा व कुणबी नोंदी तपासणी पुनश्च करा -0अर्चना घारे परब:
जिल्हाधिकारी यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी..
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करा तसेच कुणबी नोंदी तपासणी पुनश्च करा अशी आग्रही मागणी आज सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केली
तर राज्यभरात नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असताना सिंधुदुर्गात मात्र हे काम धिम्यागतीने होत आहे,शिवाय सापडलेल्या नोंदी प्रशासन समोर आणत नाही असा आरोपही त्यांनी बोलतांना व्यक्त केला.
सौ अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल कुणबी नोंदी बाबत लक्ष वेधले.यावेळी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पुजा दळवी आदी उपस्थित होते, सौ. घारे म्हणाले, सिंधुदुर्गात प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधण्यात आल्या परंतु ज्या काही नोंदी आढळल्या आहेत त्या ऑनलाइन दिसत नाहीत तसेच आढळलेल्या नोंदी आकडा प्रशासनाकडून उघड केला जात नाही त्यामुळे ज्या काही नोंदी आढळल्या त्या ऑनलाईन पद्धतीने अपलोड करा शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात अशा नोंदी कमी आढळले त्या ठिकाणी पुनर तपासणी करा असे आदेशही देण्यात आले आहे याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पुन्हा कुणबी नोंदी तपासणी करण्यात यावी अशी मागणीही केली.
दरम्यान वरिष्ठ पातळीवर याबाबत न्याय मिळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून शिंदे समितीकडे हे निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे धारे यांनी सांगितले.