मनसेतील पडझड थांबता थांबेना…
सहा महिन्यांपूर्वीच स्थापन झालेली झाराप झिरोंपॉइंट येथील शाखा “बंद”
शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा “ना”राजीनामा अन पक्षाला “राम राम”
सावंतवाडी
मनसे पक्षातील पडझड थांबण्याचे नाव घेत नसून संघटनेतील होणाऱ्या आऊटगोईंगमुळे जिल्ह्यात मनसे संघटना अक्षरशः बॅकफूट आलेली आहे. जिल्ह्यातील प्रमुख व प्रभावी सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने पक्षात निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस वाढतच चाललेली असून आज सोमवार दि.29 जानेवारी रोजी झाराप झिरोपॉईंट येथे अगदी सहा महिन्यांपूर्वी माजी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला होता त्यानंतर अंतर्गत पक्षात चाललेली कुरघोडी व निरीक्षकांची अंतर्गत गटबाजी याला कंटाळून जिल्ह्यातील पदाधिकारी आशिष सुभेदार प्रसाद गावडे विनोद सांडव सुनील गवस मंदार नाईक, नाना सावंत,बाळा बहिरे, नंदू परब,मनोज कांबळी,संदेश सावंत यांच्यासहित अनेकांनी राजीनामे दिले होते व त्यानंतर राजीनामा सत्र हे सुरूच होतं त्यात आज झाराप झिरोपॉईंट येथील प्रवेश कर्त्यांनी राजीनामे दिले व स्थापन झालेल्या शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचे पण राजीनामे देत पक्षाला सोसचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात विजय जांभळे यांच्यासह झाराप झिरोपॉईंट माजी शाखाध्यक्ष कौस्तुभ तेली, अभी पेडणेकर,गिरगोल दिया,अण्णा खोटलेकर,रुपेश गुळेकर,विशाल गावकर, नितीन गावकर, उमेश गावकर, सागर येडगे यांसह 15 जणांनी राजीनामे देत पक्षाला राम राम केला आहे. मुंबईतून आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पक्षात सक्रिय व प्रभावी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सूड भावनेने बाजूला करायचे व स्वतःच्या मागे पुढे करणाऱ्या अकार्यक्षम लोकांना जबाबदारीची पदे बहाल करून संघटना उद्धवस्त करायचा विडा उचलल्याचे नाराज होऊन व *सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षकांच्या* कुटनितीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे सांगण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण फळी मोठ्या प्रमाणावर पक्षापासून बाजूला गेल्याने पक्ष नेतृत्वाचे संघटनेवर लक्ष नसून बडवे मनमानी करू लागले आहेत, ज्यामुळे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात आहेत का असा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चेत आला असून असून येत्या काळात हे राजीनामा दिलेले पदाधिकारी जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवतात का याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मोठ्या नेत्यांचे दौरेही लागल्याने हे पदाधिकारी नेमका कोणता झेंडा हाती घेतात याबद्दल उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*