*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आरक्षण…!*
सरकार भारी की आरक्षण भारी
कुणाला काही कळलं नाही
आरक्षण दिलं की दिली ग्वाही
काहीच कळलं नाही
यातही काहीतरी कुठेतरी
राजकारणाचा वास येतोय आहे
खरचं गुलालाचा मान राखतील
की नुसतंच दाखले देतील कळतं नाही
खरंतर आरक्षणाचा प्रवास
एव्हढा सहज सोपा नाही
इतरही हातात झेंडे घेतील
आणि मतांच गणित मांडतील
मतांचं गणित सुटावा म्हणूनचं
राजकारणात बुध्दिबळाचा डाव मांडतात
हातचे प्यादे बनवूनच
मतांचा खेळ खेळतात
प्रत्येक जण हातात झेंडा घेतील
आरक्षणासाठी धावत येतील
प्रश्न खूपच गंभीर आहे
कुणाच्या खांद्यावर कुणाचा तिर आहे
कळत नाही
त्यांनी दाणे टाकले पक्षी वेचून गेले
पण तोडगा सुटला नाही
आपला हक्क दुसऱ्याला कोणी देईल का
प्रश्न अजूनही मिटला नाही
उपोषणाने काही प्रश्न सुटत नसतात
फक्त आश्वासन असतात
त्यांना ज्यूस पाजवून यांनी
स्वतःचे समाधान करून घेतले
आणि सर्वांची दिशाभूल करून गेले
पण कुणाला काही कळले नाही
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*