You are currently viewing शिवसेना जिल्हा संघटक श्री रुपेश पावसकर यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची घेतली भेट

शिवसेना जिल्हा संघटक श्री रुपेश पावसकर यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची घेतली भेट

*जिल्हयातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची ग्वाही…*

रत्नागिरी :

 

 

शिवसेना जिल्हा संघटक श्री रुपेश पावसकर यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेऊन प.पू.राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांचे प्रश्न, घोडगे सोनावडे घाट रस्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मागण्या, नेरूर ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रभाकर गावडे यांचे विकास कामांचे निवेदन, जिल्ह्यातील मोबाईल टॉवरची मागणी, सिंधुरत्न योजने विषयी चर्चा अशा विविध मागण्या यावेळी श्री.रुपेश पावसकर यांनी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केल्या. यावेळी श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी या मागण्या आपण पूर्ण करू असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा