वेंगुर्ल्यात रस्त्यावरील विक्रेत्यांची पर्यायी जागेत व्यवस्था
वेंगुर्ला
विक्रेत्यांनी वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा न बसता पर्यायी व्यवस्था केलेल्या ठिकाणी बसणे बंधनकारक असून त्याचे पालन न केल्यास विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा बसणारे किरकोळ भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते व फेरीवाले यांच्यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतुक कोंडी होत असून वाहनधारक, व्यापारी व नागरिक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या विक्रेत्यांनी त्यांच्यासाठी भाजी मार्केट परिसरात केलेल्या बैठक व्यवस्थेचा वापर करावा. तसेच भाजी मार्केटचा दर्शनी भाग हा अवजड वाहनांमधील माल उतरविण्यासाठी राखीव ठेवण्या आला असून त्याच जागी वाहने पार्क करीत असल्याने माल उतरविणे अवघड होते. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने न.प.मुख्य इमारतीच्या पार्किगमध्ये पार्क करावी. या नियमांचे उल्लंघन केल्यास नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचलित नियमानूसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.