*आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्स ” ची*
*राजन तेली , भाजपा विधानसभा प्रमुख* .
भाजपा वेंगुर्ले शहरातील सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख , शक्तिकेंद्र प्रमुख , लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी भाजप चे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली , बुथ रचना संयोजक व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व अँड. सुषमा खानोलकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , शहर प्रभारी राजन गिरप , विस्तारक मोहन घुमे ,महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना मा.आम.राजन तेली म्हणाले कि , लोकसभा निवडणुकीला दोन महीने उरले आहेत . या निवडणुकीत आपल्या पक्षाने एकुण मतदानाच्या ५१ टक्के मते मिळविण्याचे उदिष्ठ ठेवले आहे . या वेळच्या निवडणुकीत आपल्याला बुथ पातळीवरील लढाई जिंकायची आहे . त्यादृष्टीनेच केंद्रीय नेतृत्वाने गेली चार वर्षे विविध कार्यक्रम , अभियानाची आखणी केली होती . ” मेरा बुथ सबसे मजबूत ” , ” घरो – घरी संपर्क ” , ” संपर्क से समर्थन ” , ” नव मतदार नोंदणी ” ,” सरल अँप ” द्वारे प्रत्येक विधानसभेत ३० ते ५० हजार नागरिकांची नोंदणी करणे , ” सरल अँप ” द्वारे नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहीती थेट पोहचवीणे , ” धन्यवाद मोदीजी ” च्या माध्यमातून मोदी सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या लाभार्थीपर्यंत संपर्क करणे, ” फ्रेंड ऑफ बीजेपी ” द्वारे पक्षाच्या सहानभुतीदारांना पक्षाच्या प्रवाहात आणणे , तरुण वर्गाला पक्षासोबत जोडण्यासाठी ” युवा वाॅरीयर्स ” यासारखे अनेक उपक्रम पक्ष संघटनेने गेल्या चार वर्षांत राबवलेले आहेत . या उपक्रमाची रचना अत्यंत विचारपूर्वक केली होती . पक्षाच्या हक्काच्या मतदाराबरोबर पक्षाशी कधीच संबंध न आलेले मतदारही या माध्यमातून पक्ष यंत्रणेच्या संपर्कात आले . त्यामुळे बुथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांना नेमुण दिलेली कामे मुदतीत आणी योग्य पद्धतीने केली तर ५१ टक्के मतांचे उद्दीष्ट सहजरीत्या साध्य होईल असे प्रतिपादन राजन तेलीसाहेब यांनी केले .
यावेळी बुथ रचना संयोजक व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना महेश सारंग म्हणाले कि आगामी लोकसभा निवडणूक ही कमळ निशाणी वरच लढवली जाणार असून , आपला विजय नक्की आहे म्हणुन कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही . प्रत्येकाने आपल्या बुथ वर हक्काच्या मतदारा बरोबर लाभार्थी , सहानुभूतीदार , विचार परिवारातील सदस्य यांचे अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठीची यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचे सांगीतले . यासाठी बुथ पातळीवरील कार्यकर्त्याचे काम अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगीतले .
यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , महीला मोर्चा जि. सरचिटणीस वृंदा गवंडळकर ,युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेवीका शितल आंगचेकर – श्रेया मयेकर – कृपा मोंडकर – साक्षी पेडणेकर – पुनम जाधव , महीला अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , सोशल मिडीयाचे अमेय धुरी , महीला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – रसीका मठकर , ता.चिटणीस जयंत मोंडकर , बुथप्रमुख अजित कनयाळकर – रविंद्र शिरसाठ – शेखर काणेकर – पुंडलिक हळदणकर , युवा मोर्चाचे साई भोई – भुषण सारंग , सुनिल मठकर इत्यादी उपस्थित होते .