*४ वर्षांच्या प्रकरणाला २४ तासात न्याय*
दोडामार्ग :
राजेश पुंडलिक मणेरीकर, रा.मणेरी-गौतमवाडी या वीज ग्राहकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी वीज विभागाला अर्ज देऊन वीजमिटर बदलुन मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वीज विभागाने तपासणी अहवालात सदर मीटरचा दर्शनी भाग दिसत नसुन मीटरचा वीज वापर नाही असा अहवाल दिला आहे. माञ तरी ही त्या ग्राहकाला गेली ४ वर्षे सरासरी वीज बील देयक दिले जात होते डिसेंबर २०२३ मध्ये तर 26,480/- रुपये वीज बील दिले होते. ही बाब जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग तर्फे 26 जानेवारी रोजी विभागीय कार्यालय कुडाळ येथे उपोषणात अभियंता पाटिल यांना कागदपञासह जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट व दोडामार्ग वीज ग्राहक संघटना सहसचिव भूषण सावंत यांनी मांडला त्यावेळी तात्काळ दखल घेत 4 वर्षांनंतर 27 जानेवारी रोजी त्यांच्या घरी जाऊन दोडामार्ग वीज विभागाने मीटर बदलून दिला. सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना व दोडामार्ग तालुका वीज संघटनेला उपोषणात यश लाभले. 4 वर्षांनंतर आपल्याला न्याय मिळाल्याने श्री.राजेश मणेरीकर यांनी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग चे आभार व्यक्त केले.