*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.*
मुंबई
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. अखेर वाशी येथील सभेत मुख्यमत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते.आज पहाटे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोज जरांगे हे सभास्थळी निघाले. वाटेत हजारो मराठा बांधवाचे अभिनंदन करत, त्यांचे आशिर्वाद घेत मनोज जरांगेंचे पाऊनल पुढे पडत होते.
सभेला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिभन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाल लावाल, नवा जीआरही सुपूर्द केला.