कणकवली झेंडा चौक येथे मेजर आनंद पेडणेकर यांना ध्वजारोहणाचा मान
कणकवली:प्रतिनिधी
प्रजासत्ताकदिना निमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली शहरातील झेंडा चौक येथे ध्वजारोहणाचा मान भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मेजर आनंद रामचंद्र पेडणेकर यांना देण्यात आला.कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले मेजर आनंद पेडणेकर हे भारतीय सैन्य दलात देश सेवा करुन सेवानिवृत्त झाले आहेत.
कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहरातील झेंडा चौक येथे समाजातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांना ध्वजारोहणाचा मान दिला जातो.२६ जानेवारी २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सैन्य दलातून ३ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले मेजर आनंद रामचंद्र पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या.देशभक्तीपर गीतांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला..
यावेळी कणकवली काॅलेजच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंके, ,कणकवली नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवली शहरातील ज्येष्ठ व्यापारी बाळासाहेब वळंजू, किशोर धुमाळे,सुशिल पारकर,संजय मालंडकर,बंडु गांगण,अमोल खानोलकर, भालचंद्र पेडणेकर, संतोष पेडणेकर, शहरातील नागरिक, विद्यामंदिर हायस्कूल,एस.एम.हायस्कूलचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.आपल्याला ध्वजारोहणाचा मान देण्यात आल्याने मेजर आनंद पेडणेकर यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ओळ :- कणकवली शहरातील झेंडा चौक येथे ध्वजारोहण करताना मेजर आनंद पेडणेकर सोबत उपस्थित नागरिक आदी