You are currently viewing जयपूर फूट शिबिराचे कुडाळ येथे ३० जानेवारी रोजी आयोजन 

जयपूर फूट शिबिराचे कुडाळ येथे ३० जानेवारी रोजी आयोजन 

जयपूर फूट शिबिराचे कुडाळ येथे ३० जानेवारी रोजी आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा रा.स्व.संघ जनकल्याण समिती ( सेवा भारती ) व प.पू. विनायक ( अण्णा ) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट , पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा रा.स्व.संघ जनकल्याण समिती ( सेवा भारती ) व प.पू. विनायक ( अण्णा ) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट , पिंगुळी यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी जयपूर फूटचे मोफत वितरण केले जाते. त्यासाठी जानेवारी महिन्यात पायाचे मोजमाप नोंदीसाठी शिबिराचे आयोजन केले जाते. त्यानुसार मोजमाप शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी प.पू.राऊळ महाराज मठ, पिंगुळी ता.कुडाळ येथे सकाळी १० वाजता (जयपूर फूट वितरणासाठी मोजमापे घेण्यात येणार आहेत. )करणेत आले आहे. त्यानुसार अपघात / मधुमेह किंवा अन्य कारणामुळे गुडघ्याखाली पाय काढावा लागला असल्यास नावनोंदणी करता येईल. तरी गुडघ्याखाली ज्यांचा पाय काढला आहे अशा रुग्णानी आधार कार्ड झेरॉक्स व १ फोटो ( गुडघ्याखाली काढलेल्या पायाची स्थिती दर्शविणारा १ फोटो ) शिबिर स्थळी येताना आणावा. शिबिरासाठी नावनोंदणी करणेसाठी रुग्णाने स्वखर्चाने यायचे आहे. याबाबतीत काही शंका असल्यास श्री. प्रताप खामकर , कुडाळ याना 7030982260 या WA क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. …. रा स्व संघ जनकल्याण समिती (सेवाभारती) , सिंधुदुर्ग करिता प्रताप खामकर

प्रतिक्रिया व्यक्त करा