सांगितलं होतं तुला, कधीतरी भेट वेळ काढून,
चार सुखाच्या गोष्टी बोलू, सुखाची वेळ दवडू नकोस..
तुझं ते रोजचंच व्हायला लागलंय, कामात गुंतवून घेणं,
कामा बाहेरही जग असतं, मनाला फिरण्या अडवू नकोस…
किती दिवस जगणार तू, असा मन मारून?
भावना आतल्या आत कुढतील, त्यांना तू आत दडवू नकोस…
अश्रू येतील डोळ्यात तुझ्या, पुसण्या कोणीही नसतील,
त्या आसवांना डोळ्यात, कधीही साठवू नकोस…
अधीर होशील तू, कधीतरी बोलण्या आप्तांशी,
शब्दकळ्या ओठांतील तुझ्या, बाहेर सांडवू नकोस…
मन बेचैन, जीव कासावीस होईल, फुटेल घामही तुला,
पुसण्या घामाच्या धारा, कुणालाही कधी मितवू नकोस…
(दिपी)✒
८४४६७४३१९६