You are currently viewing दुकानवाड-उपवडे येथील ३ कोटी रक्कमेच्या मोठया पुलाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

दुकानवाड-उपवडे येथील ३ कोटी रक्कमेच्या मोठया पुलाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

दुकानवाड-उपवडे येथील ३ कोटी रक्कमेच्या मोठया पुलाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण…

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील दुकानवाड उपवडे येथील मोठया पुलाचे लोकार्पण व माणगाव खोऱ्याला जोडण्यात येणाऱ्या केनेडी कुपवडे कडावल वाडोस शिवापूर शिरशिंगे सह्याद्री राज्य मार्ग १९० हा महत्वाची भूमिका बजावतो. एकून ११२ की.मी. लांबी असलेला हा महामार्ग कुडाळ तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावांच्या दळणवळणात महत्वाची भूमिका बजावणारा आहे. आज या मार्गावरील दुकानवाड ते शिवापूर या टप्याच डांबरीकरणं तर याच मार्गावर उपवडे येथिल कर्ली नदीवरील उंच पातळीच्या पुलाचा शुभारंभ आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. एकूण ४ कोटी १५ लक्ष एवढा निधी खर्चून होत असलेल्या या विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला

यावेळी माजी खासदार निलेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई, काश मोरे राजू राऊळ संध्या तेसे, दीपलक्ष्मी पडते, भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मोहन सावंत, दादा बेळणेकर, राजा धुरी, भाई बेळनणेकर, पप्या तवटे दिलीप सावंत, सरपंच दीप्ती सावंत, सरपंच संजना म्हाडगुत, उपसरपंच संजय म्हाडगूत, सरपंच सुरज कदम, संदीप माडगूत शिवापुर सरपंच श्री. शेडगे,बंड्या सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा