दिवसाला दहा फेऱ्या होणार
मुंबई
आजपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावते आहे. या एसी लोकलच्या दिवसाला दहा फेऱ्या प्रायोगिक तत्वावर चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात या फेऱ्या वाढवल्या जातील. सुरुवातीला जरी या लोकल ला अल्प प्रतिसाद मिळाला तरी जेव्हा सामान्य नागरिकांनादेखील या लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळेल, तेव्हा या लोकलला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
सध्यातरी मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांनी या लोकल चे स्वागत केले आहे. पहिली लोकल पहाटे कुर्ला येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला ५.४२ वाजता तर शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ही रात्री ११.५३ सुटणार आहे.
सध्या फक्त अत्यावश्यक सेवा देणारे आणि महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेने परवानगी दिलेल्या प्रवाश्यांनाच याचा लाभ घेता येणार असला तरी लवकरच सामान्य नागरिकांनादेखील लोकलचा प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनादेखील हा गारेगार प्रवास अनुभवता येईल.
१० एसी लोकल ट्रेनची माहिती
मध्य रेल्वेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटी (मुंबई) आणि कल्याण (शेजारील ठाणे) यांच्यात चालविल्या जाणाऱ्या १० एसी लोकलपैकी दोन लोकल सीएसएमटी ते डोंबिवली (ठाणे) दरम्यान आणि चार सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान धावतील. मुख्य मार्गावरील पहिली एसी रेल्वे सेवा कुर्लाहून सकाळी ५.४२ वाजता सीएसएमटीला निघाली. शेवटची ट्रेन रात्री ११.२५ वाजता सीएसएमटी ते कुर्लाकडे धावेल.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, फक्त रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी मंजूर केलेले प्रवासी प्रवास करू शकतील.