*स्थानिक खाकीच्या आशीर्वादाने थट्टा (मालवण) येथे जुगाराची मैफिल*
*महाबलीच्या मंदिरामागे चालतो जुगार अड्डा*
सिंधुदुर्ग जिल्हा सर्वाधिक चलती असलेला धंदा म्हणजे जुगार मटका आणि दारू…! त्यापैकी जुगाराच्या धंद्याला फार मोठी इन्वेस्टमेंट लागत नाही किंवा मालकी हक्काच्या जागेची गरज नसते. जिथे कुठे जागा मिळेल तिथे पाल टाकून दिवसा ढवळ्या किंवा रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या बॅटऱ्या चार्जिंगचे बल्ब इत्यादींच्या उजेडात खुलेआम जुगार खेळले जातात.. फक्त गरज असते ती खाकी वर्दीशी संधान साधण्याची…!
मालवण तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या *थट्टा* गावातील महाबलीच्या मंदिराच्या मागे दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत जुगाराच्या मैफिली रंगतात. या मैफिलींचा म्होरक्या आहे तो कणकवलीचा “सातक्या” म्हणून ओळखला जाणारा अट्टल जुगारी आणि थट्टा येथे “पोटफुगा” या नावाने प्रसिद्ध असलेली व्यक्ती, असे दोघे मिळून हा जुगाराचा चालवतात. देवाच्या देवळाच्या मागे अवैद्य धंदे करताना या लोकांना देवाची सुद्धा भीती उरलेली नाही.. कारण, त्यांना आशीर्वाद मिळतो तो खुद्द अवैद्य धंद्यांचा नायनाट करण्यासाठी आपल्या अंगावर खाकी वर्दी घालणाऱ्या खाकीच्या शिलेदारांचा. थट्टा येथे चालणारा हाच जुगाराचा अड्डा अधून मधून है(नां)दोस गावातही चालतो. या बैठकांमधून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होते आणि त्यातून खाकीचे हात ओले होत असल्याने खाकी वर्दी कडून जुगाराच्या बैठकांकडे दुर्लक्ष केला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आपली उत्तम कारकीर्द घडविणारे अग्रवाल साहेब जिल्ह्यातील तरुणाई आकर्षित होणाऱ्या अवैद्य धंद्यांकडे गांभीर्याने पाहणार आहेत का..? असा प्रश्न जनतेला पडत आहे.